नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड झाली.
नाशिक महानगरपालिकेच्या राजीव गांधी मुख्यालयातील स्थायी समितीच्या सभागृहात स्थायी समिती सभापती निवडीसाठी बोलावलेल्या विशेष महासभेत सत्ताधारी महायुतीकडून सभापती पदासाठी मच्छिंद्र सानप तर महायुतीतीलच घटक राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
निवडणूक प्रक्रियेत अर्ज माघारीच्या वेळी भाजपाचा पदाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापती पदासाठीच्या अर्ज माघारीसाठी विनंती केल्याने मुकेश शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने तटस्थपणाची भूमिका स्वीकारली. पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यांनी काम पाहिले.
पत्रकारांचा बहिष्कार
नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आज बोलावलेल्या महापालिकेतील विशेष सभेला प्रवेश नाकारल्याने या सदैव बहिष्कार टाकला.