खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आणखी एकाचा बळी
खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आणखी एकाचा बळी
img
दैनिक भ्रमर
खड्ड्यांमुळे नाशिक शहरात आणखी एका निष्पापाचा बळी गेला आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या भाजी विक्रेत्याची मृत्यूशी २५ दिवसांपासून सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. दिलीप दामोधर काळे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.  दिलीप काळे हे भाजी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. ते सकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडले असताना विक्टर गॅस्केट चौफुली परिसरात रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढत असताना मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. गेल्या २५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ते कोमात असल्याने कुटुंबीयांची आशा मावळत चालली होती. अखेर काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे सातपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group