नाशिक : अल्पवयीन मुलीचे अश्‍लील फोटो व्हायरल करून चारित्र्यहनन, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक : अल्पवयीन मुलीचे अश्‍लील फोटो व्हायरल करून चारित्र्यहनन, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
img
दैनिक भ्रमर
नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावून तिचे अश्‍लील फोटो काढून तिचा विनयभंग करीत ते फोटो वडिलांच्या मोबाईलवर पाठवून चारित्र्यहनन केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ही अल्पवयीन मुलगी आहे. संशयित आरोपी ओम्कुमार अनंतराव मोरे (रा. येस बँकेजवळ, पवननगर, सिडको) याने ओळखीचा फायदा घेऊन फिर्यादीला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने 29 सप्टेंबर रोजी पीडितेला बोलावले. त्यावेळी आरोपीने पीडितेशी अंगलट करीत तिचे अश्‍लील फोटो काढले, तसेच स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यानंतर आरोपीने पीडितेला अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिला घरी बोलावून तिच्याशी इच्छेविरुद्ध कृत्य केले. 

अखेर दि. 3 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपीने पीडितेला नाशिक येथे भेटावयास बोलावले असता तिने नकार दिला. त्याचा राग आल्याने आरोपी ओम्कुमार याने पीडितेचे काढलेले न्यूड फोटो तिच्या वडिलांच्या मोबाईलवर व पीडितेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाठवून तिची बदनामी केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात ओम्कुमार मोरेविरुद्ध पोक्सोअंतर्गत, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group