नाशिकच्या 'या' माजी नगरसेवकाची सोशल मीडियावर बदनामी, तिघांविरुद्ध गुन्हा
नाशिकच्या 'या' माजी नगरसेवकाची सोशल मीडियावर बदनामी, तिघांविरुद्ध गुन्हा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : माजी नगरसेवक सलिम मामा शेख यांचा फोटो व नावाचा वापर करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला व्हिडिओ ठेवून बदनामी केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सलिम मामा इस्माईल शेख (रा. श्रीकृष्णनगर, सातपूर कॉलनी) हे माजी नगरसेवक आहेत. संशयित धीरज अशोक शेळके (रा. जाधव संकुल, सातपूर), योगेश ऊर्फ बंटी दत्तात्रय लभडे व त्याचा भाऊ अमोल ऊर्फ पिंटू दत्तात्रय लभडे (दोघेही रा. जुनी म्हाडा बिल्डिंग, सातपूर कॉलनी) यांनी संगनमत करून फिर्यादी शेख यांचा फोटो व नावाचा वापर करून एआयच्या सहाय्याने बदनामीकारक बनावट व्हिडिओ तयार केला. 

नंतर हा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवून जातीय द्वेष निर्माण केला, तसेच शेख यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून फिर्यादीची बदनामी केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group