मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर खोपोलीजवळ नवीन बोगद्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात  ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू कऱण्यात आले आहे.

माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर खोपोली एक्झिट जवळील नवीन बोगद्यात थोड्या वेळापूर्वी अपघात झाला. चार ते पाच गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे भयंकर अपघात झाला. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जणांना दुखापत झाल्याची माहिती आहे. जखमींना पोलिसांकडून तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोपोली एक्झिटजवळ असलेल्या नवीन बोगद्यात आज सकाळी चार ते पाच वाहनांचा अपघात झाला. कार, कंटेनर आणि टँकरची एकमेंकाना जोरात धडक झाली.अपघात इतका भंयकर होता की कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर उपस्थित असणार्‍यांनी तात्काळ मदत करण्यासाठी धाव घेतली. पोलीसही घटनास्थळाकडे पोहचले. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनची यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि हेल्प फाउंडेशन मार्फत मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group