Panchayat Samiti Election: माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव, भाजपच्या मनीषा पाचंगे विजयी
Panchayat Samiti Election: माजी सरपंच निर्मला नवलेंचा पराभव, भाजपच्या मनीषा पाचंगे विजयी
img
वैष्णवी सांगळे
सोशल मिडीयावर सतत ऍक्टिव्ह असणाऱ्या आणि मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फॅन फॉलोअिंग असलेल्या शिरुर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात पराभवाचा धक्का बसला आहे. 

निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. नवले यांची पंचायत समिती निवडणुकीत मात्र जादू चालू शकली नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना ३०० मतांनी पराभूत केले. हा निर्मला नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

काही वर्षांपूर्वी निर्मला नवले यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. तेव्हापासून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. उच्चशिक्षित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून निर्मला नवले या कायम चर्चेत असायच्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत निर्मला नवले यांची जादू चालू शकली नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group