तिरुपतीचं साकडं देवाने ऐकलं! थलपतीच्या विजयानंतर कथित गर्लफ्रेंड त्रिशाची 'खास' भेट; लग्नाची हिंट मिळाली?
तिरुपतीचं साकडं देवाने ऐकलं! थलपतीच्या विजयानंतर कथित गर्लफ्रेंड त्रिशाची 'खास' भेट; लग्नाची हिंट मिळाली?
img
नितीशा कुलकर्णी





दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या कथित अफेअरच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर तुफान आणले आहे. त्यातच आजचा दिवस या जोडीसाठी दुप्पट आनंदाचा आणि अत्यंत खास ठरला आहे. एकीकडे थलपती विजयने राजकारणाच्या मैदानात 'मोठी फळी' मारत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे, तर दुसरीकडे आज त्रिशाचा वाढदिवसही आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिरुपती चरणी विजयच्या विजयासाठी साकडं घालणाऱ्या त्रिशाचं गाऱ्हाणं जणू देवाने ऐकलंच! विजयाची बातमी येताच त्रिशाने थेट थलपतीच्या घरी धाव घेतली असून, त्यांच्या या भेटीचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

विजयच्या विजयाचा गुलाल आणि त्रिशाचा वाढदिवस यामुळे या 'कथित' जोडीच्या नात्यावर आता लग्नाची मोहोर उमटणार का? अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. एकिकडे निवडणुकीत विजय तर दुसरीकडे कथित गर्लफ्रेंडचा बर्थडे आणि तिची पहिली भेट. थलपतीचा निवडणुकीत विजय झाल्यानंतर त्रिशा विजयला भेटायला त्याच्या घरी गेली. ज्याचा व्हिडीओही समोर आला आहे. विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर थलपती आणि त्रिशा कृष्णन यांच्या अफेअरची चर्चा कित्येक दिवसांपासून रंगते आहे. त्यानंतर दोघं एका कार्यक्रमात एकत्र दिसले. दरम्यान आज निवडणुकीआधी त्रिशा तिरुपती मंदिरातही गेली. निमित्त होतं ते तिच्या वाढदिवसाचं.

आज तिचा बर्थडेही आहे. पण तिने देवाकडे विजयसाठी साकडं घातल्याची चर्चा होऊ लागली आणि तिचं गाऱ्हाणं देवाने ऐकलं. विजयचा विजय झाला आहे. यानंतर त्रिशा थेट विजयच्या घरी गेली आहे. निवडणूक विजयानंतर तिने विजयच्या घरी जाऊन खास भेट दिली. एएनआयने त्रिशाच्या विजयच्या घराजवळचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्रिशा विजयच्या घराजवळ कारमध्ये दिसते आहे. तिने विजयची घरी भेटल्याचं एएनआयने सांगितलं आहे.

त्रिशाच्या कारभोवती चाहत्यांची गर्दी दिसते आहे. त्रिशा यामध्ये क्युट रिएक्शनही देताना दिसते. दरम्यान, निवडणुकीनंतर विजय-त्रिशा लग्न करणार असल्याच्या चर्चाही काही दिवसांपूर्वी होत होत्या. तसा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि तो त्रिशाच्या आईनेही लाइक केला होता. त्यामुळे त्रिशाच्या आईने त्यांच्या लग्नाची ही दिलेली एकप्रकारची हिंटच असल्याचं म्हटलं गेलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group