प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक घटना घडली असून शुटिंगदरम्यान झालेल्या अपघातात या अभिनेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. बंगाली अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जी याचं वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालं आहे. ओडीशा येथील तलसारी बिचवर शुटींग करत असताना ही धक्कादायक घटना घडली. अभिनेत्याच्या निधनानं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
सध्या अभिनेत्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेता शुटिंग करताना दिसत आहे. फोटो मृत्यूच्या काही वेळ आधीचे असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. अभिनेत्याच्या निधनानंतर सेटवरील प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. माहितीनुसार, 43 वर्षीय अभिनेता राहुल बॅनर्जी रविवारी म्हणजे 29 मार्च रोजी टीव्ही मालिका ‘भोले बाबा पार करेगा’ चं शुटिंग करत होता. शुटिंगच्या एका सीनमध्ये अभिनेत्याला पाण्यात उतरायचं होतं. असं देखील सांगण्यात येत आहे की, सीन पूर्ण झाल्यानंतर अभिनेता पाण्यात गेला. त्यानंतर पाण्यातून अभिनेता जिवंत परतला नाही.
राहुल याच्या शुटिंग दरम्यानचे काही फोटो सध्या चर्चेत आले आहे. पाण्यात जाण्यापूर्वी त्याने एक सीन शूट केला. तो सीन अभिनेत्याचा शेवटचा सीन असल्याचं आता सांगण्यात येत आहे. जेव्हा अभिनेता समुद्रात उतरला, तेव्हा जोरदार लाटांमुळे किंवा पाण्याच्या खोलीमुळे अभिनेत्याचा बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला सेटवर असलेल्यांना परिस्थिती इतकी गंभीर होईल याची कल्पना नव्हती. पण उशीर झाला तरी अभिनेता परत आला नसल्याने खळबळ माजली… त्यानंतर असं काही घडेल त्याची कल्पना कोणीच केली नसेल. अभिनेत्याच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली…