हास्यजत्रा' फेम अरुण कदमांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली 'गुड न्यूज
हास्यजत्रा' फेम अरुण कदमांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन! सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली 'गुड न्यूज
img
नितीशा कुलकर्णी


महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्य सातुन घरा घरात पोहोचलेला अभिनेता अरून कदम यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केलीय. अभिनेत्याच्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आज प्रत्येक घरात मोठ्या आवडीनं पाहिला जातो.

या कार्यक्रमातील विनोदवीरांवर अख्खा महाराष्ट्र भरभरुन प्रेम करतोय. प्रत्येकानं आपल्या आगळ्या-वेगळ्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं आणि खास स्थान निर्माण केलंय. प्रेक्षक आणि हास्यजत्रेतील कलाकारांचं बॉन्डीग एवढं झालंय की, प्रत्येक सुख-दुःख हे विनोदवीर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

अशातच नुकतीच एक गूड न्यूज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील विनोदवीरानं आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्यानं आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेते अरुण कदम यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

अरुण कदम यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन यासंदर्भात आनंदाची बातमी शेअर केली आहे. अरुण कदम यांनी त्यांची भन्नाट विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगमुळे प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलंय. आग्री-कोळी स्टाईलमध्ये त्यांनी केलेले स्किट्स प्रेक्षकांच्या थेट काळजात घर करतात. अशातच प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते अरुण कदम यांनी नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अरुण कदम यांच्या आयुष्यात आली नवी पाहुणी

अरुण कदम यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या नव्या पाहुणीबाबतची माहिती शेअर केली आहे. अरुण कदम यांच्या आयुष्यात आलेली नवी पाहुणी म्हणजे, त्यांनी नवीकोरी गाडी. अलिकडेच त्यांनी एक नवी गाडी खरेदी केली असून, त्याचा व्हिडीओ शेअर करत ही खुशखबर दिली आहे.

अरुण कदम यांनी 'मारुती SUV Victoris' ही कार घेतली आहे, ज्याची किंमत अंदाजे 10.49 लाख ते 19.99 लाख रुपये इतकी आहे. या खास क्षणी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत उपस्थित होते. नवी गाडी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या नातवाला मांडीवर घेऊन ड्रायव्हिंग सीटवर बसलेला व्हिडीओही शेअर केला आहे. त्यांच्या या नव्या खरेदीबद्दल चाहते आणि अनेक सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group