ऑस्करमध्ये ‘धुरंधर’ला का नाही एंट्री ? ज्यूरी सदस्यांनी सांगितलं कारण
ऑस्करमध्ये ‘धुरंधर’ला का नाही एंट्री ? ज्यूरी सदस्यांनी सांगितलं कारण
img
Nandini khandare More

मराठी चित्रपट सृष्टी साठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली ती म्हणजे 99व्या अकादमी अवॉर्डससाठी (ऑस्कर) भारतातर्फे ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली. 

ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून चित्रपटाची निवड झाल्यावर चहूकडे या चित्रटाची चर्चा सुरू आहे. एकीकडे गोंधळची निवड झाल्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण असून संपूर्ण टीमचं अभिनंदन करण्यात येत आहे. याचदरम्यान आता आणखी एक चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे धुरंधर चित्रपट.  

 रणवीर सिंग या वर्षातील सर्वात मोठा आणि यशस्वी चित्रपट ठरलेल्या धुरंधरची यंदा निवड कशी झाली नाही आणि गोंधळ चित्रपट कसा निवडण्यात आला हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. याच पार्श्वभूमीवर आता फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे ज्यूरी सदस्य विवेक वासवानी यांन, धुरंधरची निवड का झाली नाही याचं कारण स्पष्ट केलं आहे.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना विवेक वासवानी यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शेवटचा निर्णय घेताना धुरंधर चित्रपट ज्यूरीच्या पसंतीत कोणत्या स्थानी होता, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सांगितलं की, काही लोकांना चित्रपट आवडला होता, पण ही फिल्म ऑस्करसाठी योग्य आहे, असं आम्हाला वाटलं नाही, असं त्यांनी नमूद केलं.

धुरधला किती मिळाली मतं ?

ज्युरींना चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती ज्या पद्धतीने दाखवायची होती, त्या निकषांवर ‘धुरंधर’ पूर्णपणे उतरू शकला नाही, असंही विवेक यांनी सांगितलं. 14 सदस्यांच्या ज्युरीपैकी किती जणांनी ‘धुरंधर’च्या बाजूने मतदान केले, असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की धुरंधरला फक्त 4 मतं मिळाली.

गोंधळची निवड कशी झाली ?

रिपोर्टनुसार, एकूण 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. या यादीत 14 हिंदी, 4 मराठी, 4 तेलुगू, 3 गुजराती, 3 तमिळ, 1 मल्याळम, 1 नेपाळी आणि नागालँडमधील एका चित्रपटाचा समावेश होता. ज्युरीच्या अंतिम तीन पर्यायांमध्ये ‘गोंधळ’, ‘अंग’ आणि ‘मैं वापस आएगा’ यांचा समावेश होता. अखेर मराठी चित्रपट ‘गोंधळ’ला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रणवीर सिंहची प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. या मालिकेतील पहिला चित्रपट डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला, तर ‘धुरंधर: द रिव्हेंज’ मार्च 2026 मध्ये चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला. चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली असून, संपूर्ण फ्रँचायझीने जगभरात सुमारे 3000 कोटी रुपयांची कमाई केली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group