दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
थलपती विजय मदुराई विमानतळावर पोहोचला तेव्हा त्यांच्या एका बॉडीगार्डने अचानक एका वृद्ध चाहत्यावर बंदूक रोखली तेव्हा मोठा गोंधळ उडाला.
अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची सर्वत्र गर्दी जमली. तेव्हा एका वृद्ध चाहत्यावर बॉडीगार्डने अचानक बंदूक रोखली. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयबालनने या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, विजय त्याच्या गाडीतून उतरताना दिसत आहे. कदाचित स्टारला भेटण्याच्या आशेने एक वृद्ध चाहता अभिनेत्याकडे धावत येतो. अशात अभिनेत्याचा एक बॉडीगार्ड अचानक बंदूक काढतो आणि चाहत्यावर रोखतो…
लक्षवेधी गोष्ट म्हणजे, थलापती विजय या घटनेकडे दुर्लक्ष करतो आणि थेट विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश करतो. या घटनेने चाहत्यांना धक्का बसला. परंतु चाहत्याला कोणतीही इजा झाली नाही आणि सुरक्षितपणे आहे हे, पाहून अनेकांना दिलासा मिळाला. व्हिडीओवर अभिनेत्याच्या अनेक चाहत्यांनी संताप देखील व्यक्त केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.