बॉलिवूडचे 'बिग बी' यांचे पत्नीबद्दल मोठे विधान, म्हणाले..…
बॉलिवूडचे 'बिग बी' यांचे पत्नीबद्दल मोठे विधान, म्हणाले..…
img
Dipali Ghadwaje
अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हटले जाते.अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक मोठे चढउतार देखील बघितले आहेत. एक काळ त्यांच्या आयुष्यामध्ये असा आला होता की, त्यांच्यासोबत कोणतीही अभिनेत्री चित्रपट करण्यास तयार नव्हती. मात्र, ज्या चित्रपटासाठी अभिनेत्रींनी नकार दिला आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला.

अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे या सीजनबद्दल प्रेक्षकांमध्येही कमालीची क्रेझ बघायला मिळत आहे

अशातचअमिताभ बच्चन यांनी आता नुकतच मोठे भाष्य केले आहे. काैन बनेगा करोडपतीच्या मंचावर हॉट सीटवर हर्षित भूटानी बसले. हर्षित म्हणाला की, इथे बसण्यासाठी मी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतो. अखेर माझे ते स्वप्न आज पुर्ण झाले आहे. हर्षित म्हणाला, माझ्यामध्ये आणि माझ्या पत्नीमध्ये चॅलेज लागले होते की, इथे सर्वात अगोदर कोण पोहोचणार.

हर्षितने आपल्या पत्नीला म्हटले की, बघ तुझ्या अगोदर मी इथे पोहोचलो. हर्षितची पत्नी म्हणाली की, मीच यासाठी तुला ट्रेनिंग दिले आहे. दोघांमधील बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांनी हर्षितला म्हटले की, पत्नीसमोर नेहमीच हार मानली पाहिजे. पत्नीसमोर हार मानली पाहिजे, तीच नेहमी बरोबर असते. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले की, आतमधील गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण…...,आता अमिताभ बच्चन यांच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या घरी जया बच्चन याच बॉस आहेत. यापूर्वीही अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांनी सांगितले आहे. यामुळेच अमिताभ बच्चन हे पत्नीच नेहमी बरोबर असल्याचे म्हणताना दिसत आहेत.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group