स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळंच स्थान निर्माण केले आहे. अलिकडेच या मालिकेतील अस्मिता म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका दबडेच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. मोनिकाने १५ मार्च या दिवशी गोंडस मुलीला जन्म दिला. आता अभिनेत्रीच्या लेकीचा नामकरण सोहळा थाटामाटात पार पडला आहे. याचबद्दल सोशल मीडिवर मोनिकाने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.
15 मार्च रोजीला मोनिका दबाडेने लेकीला जन्म दिला. आत जवळपास दोन महिन्यांनी लेकीला गोंडस नाव दिलं आहे. यामध्ये तिने बाळाच्या नावाचा अर्थ देखील शेअर केला आहे. यासोबतच तिने बाळाचं नाव ज्या पद्धतीने शेअर केलं ती पद्धत देखील अतिशय अनोखी आहे.
मोनिकाच्या लेकीच नाव
मोनिका दबाडेने लेकीला 'वृंदा' असं नाव दिलं आहे. बारशाचा फोटो शेअर करत मोनिकाने एक पोस्ट देखील केली आहे. वृदा म्हणजे पवित्र तुळस... तुमच्या सर्वांचे प्रेम असेच कायम राहू द्या अशी पोस्ट शेअर केली आहे.
नाव शेअर करण्याची अनोखी पद्धती
मोनिकाने लेकीचं नाव हे एका गोधडीवर लिहून घेतलं आहे. गोधडी हे लहान मुलांसाठी अतिशय सुरक्षित मानली जाते. तसेच गोधडी कायम आजीच्या किंवा आईच्या मऊसुद साडीने तयार केली जाते. त्यामधून मिळणारी ऊब ही मायेची समजली जाते. त्यामुळे ही पद्धत अनोखी ठरली.