शुक्रवारी दुपारी अभिनेता अल्लू अर्जून याला अटक झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. मात्र पुष्पा-2 च्या या स्टारला लगेचच जामीन मिळाला होता. पण त्यानंतरही अल्लू अर्जुन याला एक रात्र तुरूंगातच घालवावी लागली. पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनची आज सकाळी तुरूंगातून सुटका झाली आहे.
पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रिमीयर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्यांच्या परिवारासह चाहते नाराज झाले होते. अशातच आज अल्लु अर्जुनची सुटका झाल्यानंतर अभिनेता त्याच्या घरी पोहोचला आहे याचदरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुरूवारी दुपारी अल्लु अर्जनला त्यांच्या राहत्या घरातून अटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी अल्लू अर्जुनच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी अल्लू अर्जुनला हैद्राबाद येथील चंचलगुडा कारागृहात आणले होते. आज अल्लूची सुटका झाली असून अल्लू अर्जुन त्याच्या घरी पोहोचला आहे.
सोशल मिडिया ट्विटरवर अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अर्जुन घरी पोहचल्यानंतर त्याची पत्नी धावत येऊन मिठी मारत रडताना दिसते आहे. अर्जुनची छोटी मुलगी देखील सोबत आहे. सोशल मीडियावर याचदरम्यानचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.