'पुष्पा 2' ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, अ‍ॅडव्हान्स बुकींगमध्येच छप्पडफाड कमाई
'पुष्पा 2' ची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी, अ‍ॅडव्हान्स बुकींगमध्येच छप्पडफाड कमाई
img
Dipali Ghadwaje
अल्लू अर्जुन , रश्मिका मंदाना आणि फहद फासिल स्टारर 'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर  धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. पण, फक्त रिलीजपूर्वीच त्याची क्रेझ संपूर्ण जगभरात पसरली आहे.

त्यामुळे सुकुमार दिग्दर्शित मास क्शन ड्रामा असलेल्या या चित्रपटाची तिकिटं डव्हान्स बुकिंगमध्ये हॉटकेकप्रमाणे विकली जात आहेत. प्री-तिकीट सेलमध्ये या चित्रपटानं फायटर आणि कल्की 2898 एडी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडले आहेत. एवढंच काय तर, 'पुष्पा- 2 द रूल'च्या डव्हान्स बुकिंगमुळे पीव्हीआर आयनॉक्सच्या शेअर्समध्ये सुमारे तीन टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 426 कोटी रुपयांची वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. 
  
'पुष्पा 2' कडून हिंदीतील टॉप चेन्समधील 'या' चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत

'पुष्पा 2: द रुल'नं 10:45 वाजेपर्यंत (2 डिसेंबर 2024) पहिल्या तीन नॅशनल चेन्स – PVRinox आणि Cinepolis मध्ये पहिल्या दिवसासाठी 1 लाख 52 हजार 500 पेक्षा जास्त तिकिटांची विक्री केली होती. पीव्हीआर आयनॉक्स 1 लाख 21 हजार 500 तिकिटांच्या बुकिंगसह प्री-सेलमध्ये आघाडीवर आहे, तर सिनेपोलिसनं जवळपास 31 हजार तिकिटांची अॅडव्हान्स बुकिंग केली आहे. यासह पुष्पा 2 नं 'फायटर' (1.25 लाख), 'कल्की 2898 AD' (1.25 लाख), 'RRR' (1.05 लाख), 'दृश्यम 2' (1.16 लाख) सारख्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे .


'या' चित्रपटांना मागे टाकनं 'पुष्पा 2: द रुल'चं लक्ष्य 

अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2: द रुल'चे आतापर्यंत 1.55 लाख तिकीटांची विक्री झाली आहे. मंगळवारी याचे 2 लाख प्री-सेल पार करण्याची शक्यता आहे. पुष्पा 2 चं लक्ष्य नॅशनल चेन्समध्ये 5 लाख तिकीटं विकायची आहेत आणि हिंदीमध्ये आतापर्यंतची टॉप 5 सर्वात बाहुबली 2 (6.50 लाख), जवान (5.57 लाख), पठान (5.56 लाख) आणि केजीएफ चैप्टर 2 (5.15 लाख) मध्ये आपली पोजिशन सिक्योर करायची आहे. 

'पुष्पा 2'ची गुजरात, महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक कमाई 

गुजरात आणि महाराष्ट्रात प्री तिकीट सेलमध्ये पुष्पा 2 उत्तम परफॉर्म करत आहे. हा चित्रपट ओपनिंगच्या दिवशी सर्व रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झाला आहे. केवळ नॅशनल चेनमध्येच नाही तर 2 नॉन नॅशनल चेनमध्ये देखील मास ॲक्शनरनं मूव्हीमॅक्स चेनमध्ये 12,800 तिकिटं बुक केली आहेत, तर राजहंसनं जवळपास 25 हजार तिकिटं विकली आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येतो, तसतसे प्रमुख गैर-राष्ट्रीय साखळींमध्येही त्याच्या ॲडव्हान्स  बुकिंगमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group