अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी त्यांचा पहिला चित्रपट 'सैयारा'नं धमाल केली आहे. हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करतोय आणि सर्वांना आश्चर्यचकित करतोय.
यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांचा ‘सैयारा’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियासह बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटाचे संगीत आधीच वर्षातील सर्वोत्कृष्ट अल्बम ठरत आहे.
यात फहीम-अर्सलान यांचे टायटल ट्रॅक सैयारा, जुबिन नौटियाल यांचे बर्बाद , विशाल मिश्रा यांचे तुम हो तो, सचेत-परंपरा यांचे हमसफर आणि अरिजीत सिंग आणि मिथून यांचे धुन हे गाणे देशभरातील म्युझिक चार्ट्स वर धुमाकूळ घालतात आहेत.
‘सैयारा’ 18 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अहान पांडेने ‘सैयारा’ चित्रपटात ‘कृष कपूर’ नावाच्या रॉकस्टारची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री अनिता पद्ढा‘वाणी’च्या भूमिकेत दिसली आहे.
दरम्यान या चित्रपटाने रिलीजच्या पाचही दिवशी आणि विकेंटला बक्कळ कमाई केली आहे. YRF आणि मोहित सुरी यांच्या सैयारा या चित्रपटाने भारतात 48.25 कोटी रुपये कमावले आहेत.
या चित्रपटाने अहान पांडे आणि अनित पड्डा यांना एका रात्रीत स्टार आणि संपूर्ण देशाचे लाडके बनवले आहे. तर चित्रपटाच्या तीन दिवसांच्या आकडेवारीबद्दल सांगायचे झाले तर शुक्रवारी – ₹ 22 कोटी, शनिवारी – ₹ 26.25 कोटी, रविवारी – ₹ 36.25 कोटी, सोमवारी – ₹ 24.25 कोटी, सोमवारी – ₹ 25.00 कोटी, एकूण – ₹ 133.75 कोटी. अशी कमाईची शिखर गाठतं या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे. त्यामुळे 2025 मध्ये बॉक्सऑफिसवर सैयाराची चलती आहे. असं म्हणायला हरकत नाही.