"त्या" विधानाने वादाच्या भोवऱ्यात अडकली अभिनेत्री करीना, अनेकांनी व्यक्त केला संताप
img
Dipali Ghadwaje
करीना कपूर फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.  अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. पण अभिनेत्री आता असं काही बोलली ज्यामुळे अनेकांनी करीनाला ट्रोल केलं आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात करीना हिने स्वतःची तुलना माता सीता यांच्यासोबत केली आहे. ज्यामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे .

सध्या करीना कपूर हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री माता सीता यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘माता सीता यांच्या शिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही, त्याच प्रमाणे करीना कपूर शिवाय रोहित शेट्टी याचा सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही…’ सध्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

 

करीना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत अजय देवगन, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, अर्जुन कपूर आणि टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group