ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी तब्येतीच्या तक्रारीमुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांना गुरुवारी रात्री अचानक श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली, त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करीत असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्या डिस्चार्जबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी अद्याप याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
धर्मेंद्र यांचं वय ८९ आहे. ८ डिसेंबर रोजी ते नव्वदी गाठणार आहेत. या वयातही त्यांची ऊर्जा, उत्साह, काम करण्याची इच्छा ही तरुणांनाही लाजवणारी असते. अनेकदा ते आपल्या दोन्ही मुलांसोबत नाचताना, गप्पा मारताना दिसतात.