‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सध्याच्या भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सामान्यांप्रमाणे अनेक कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. त्यात अनेकांनी आपले चित्रपट पुढे ढकलले आहेत तर कोणी सैन्याला आपल्या कमाईचा अर्धा हिस्सा समर्प्रित केला आहे. त्यातच आता अभिनेता शाहरूख खाननेही मोठा निर्णय घेतला आहे. त्याने भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खानची मोठी अॅक्शन घेतली आहे.
शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा ‘किंग’ पुढच्या वर्षी येणार आहे. या चित्रपटाचे शुटींग 16 मे पासून मुंबईत सुरू होणार आहे. एकीकडे चाहते शाहरुख खानच्या पुनरागमनासाठी उत्सुक आहेत, तर दुसरीकडे, सुहाना खान या चित्राद्वारे बॉलिवूडमध्ये एक मोठी एन्ट्री घेताना दिसणार आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, शाहरुख खान आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अनेक प्रॉडक्शन हाऊसेसनी त्यांचे प्रकल्प पुढे ढकलले आहेत. त्याच वेळी, निर्मात्यांनी राजकुमार रावचा चित्रपट थिएटरमधून काढून टाकण्याची आणि तो ओटीटीवर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. याआधीही पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने आपला युके दौरा रद्द केला होता. अलिकडेच आमिर खानने ‘सीतारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीजही पुढे ढकलला आहे. आता शाहरुखही मोठा निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.