प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात , अपघातामध्ये कलाकाराच्या वडिलांचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी
प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात , अपघातामध्ये कलाकाराच्या वडिलांचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी
img
Dipali Ghadwaje
मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाईन टॉम चाको याच्या कारचा भीषण अपघात घडला आहे. या दुर्दैवी घटनेत त्याचे वडील सी.पी. चाको यांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील पलाकोट्टईजवळ हा अपघात घडला आहे असून, त्यांची कार एका लॉरीशी धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारचा चक्काचुर झाला.

सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.  सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चाको याच्या कारचा भीषण अपघात घडला. त्याची कार एका लॉरीशी धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात शाईनच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारमध्ये उपस्थित असलेले लोक गंभीर जखमी झाले.

अपघात घडल्यानंतर शाईन टॉम चाकोसह इतर जखमी सदस्यांना तातडीने पलाकोट्टई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाईन टॉम चाकोची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

शाईन टॉम चाको हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

या अपघाताच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group