सिनेसृष्टी हादरली! आशा भोसले यांच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच बड्या अभिनेत्याची एक्झिट!
सिनेसृष्टी हादरली! आशा भोसले यांच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच बड्या अभिनेत्याची एक्झिट!
img
Jayshri Rajesh



मुंबई: मनोरंजन विश्वासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरत आहे. आशा भोसले यांच्या जादुई आवाजाचा अस्त झाल्याने आधीच पोरकी झालेली सिनेसृष्टी आता आणखी एका धक्क्याने हादरली आहे. एका महान आणि कसदार अभिनेत्याच्या निधनाने अभिनयाच्या एका समृद्ध पर्वाचा अंत झाला आहे. 

बंगाली चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या सहज आणि कसदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते व प्रख्यात निवेदक बिप्लब दासगुप्ता यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त होते. 

शुक्रवारी त्यांना अचानक तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने बंगाली चित्रपट आणि नाट्यसृष्टीवर मोठी शोककळा पसरली असून, एका अष्टपैलू कलाकाराला मुकल्याची भावना व्यक्त होत आहे. दासगुप्ता यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. 

काही दिवसांपूर्वीच वयाच्या ८० व्या वर्षी अभिनेते तमाल रॉय चौधरी यांचे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. वृद्धापकाळाशी संबंधित शारीरिक व्याधींमुळे ते बरेच दिवस पडद्यापासून लांब होते.

बंगाली चित्रपट, नाटक आणि मालिका विश्वातून सलग दोन अत्यंत दुःखद बातम्या समोर आल्याने संपूर्ण कलाविश्व हादरून गेले आहे. आपल्या कसदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते बिप्लब दासगुप्ता आणि तमाल रॉय चौधरी या दोघांचेही अवघ्या दीड महिन्याच्या अंतराने निधन झाले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रतिभावान कलाकार पडद्याबाहेर एकमेकांचे जिवलग मित्र होते, त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपट जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

त्यांनी मीरा नायर यांच्या 'द नेमसेक' या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या चित्रपटात साकारलेली इरफान खान यांच्या वडिलांची भूमिका प्रचंड गाजली होती. यासोबतच 'चॅलेंज' आणि 'अमेझॉन ओभिजान' यांसारख्या अनेक सुपरहिट व्यावसायिक चित्रपटांमधून त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 

बिप्लब दासगुप्ता यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांची 'बाईशे श्रावण' 'गुमनामी' आणि 'झुल्फिकार' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील कामे विशेष गाजली. याशिवाय २०२२ मधील 'अ होली कॉन्स्पिरसी या प्रसिद्ध कोर्टरूम ड्रामा चित्रपटात त्यांनी साकारलेली न्यायाधीशाची भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली आहे. 

त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी ते 'टेक्निशियन्स स्टुडिओ'मध्ये नेण्यात आले होते, जिथे चित्रपट, टीव्ही आणि ओटीटी क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group