आध्यात्माच्या ओढीने भारतात आली अन् बनली 'आयटम क्वीन'! 'बाबूजी जरा धीरे चलो' फेम याना गुप्ताचा थक्क करणारा प्रवास
आध्यात्माच्या ओढीने भारतात आली अन् बनली 'आयटम क्वीन'! 'बाबूजी जरा धीरे चलो' फेम याना गुप्ताचा थक्क करणारा प्रवास
img
नितीशा कुलकर्णी







मुंबई: चित्रपटसृष्टीतील झगमगाट, प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असूनही अनेक कलाकार अंतर्मनात शांततेचा शोध घेत असतात. असाच एक आगळावेगळा प्रवास अनुभवायास मिळाला तो म्हणजे बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री याना गुप्ता हिचा. युरोप आणि जपानमध्ये मॉडेलिंग क्षेत्र गाजवल्यानंतर आध्यात्माच्या ओढीने भारतात आलेल्या यानाने 'आयटम गर्ल' म्हणून ओळख मिळवली, पण तिचा हा प्रवास संघर्षाने भरलेला होता.

संघर्षातून मिळालेले यश

२३ एप्रिल १९७९ रोजी ब्रनो (झेक प्रजासत्ताक) येथे जन्मलेल्या यानाचे मूळ नाव 'जाना सिंकोवा' होते. लहानपणीच पालकांचा घटस्फोट झाल्याने आईने एकट्याने तिचा सांभाळ केला. आर्थिक अडचणींमुळे बालपण संघर्षात गेले, पण या जिद्दीनेच तिला जगासमोर उभे केले. शांततेच्या आणि आत्मशोधाच्या ओढीने ती भारताकडे वळली, मात्र नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते.

एका गाण्याने बदललं नशिब

२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दम' चित्रपटातील ‘बाबूजी जरा धीरे चलो’ या गाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत जणू वादळ आणले. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की चित्रपटापेक्षा अधिक चर्चा याना गुप्ताची झाली. या एका गाण्याने तिला रातोरात सुपरस्टार बनवले. त्यानंतर तिला बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतून अनेक ऑफर्स मिळाल्या

ग्लॅमरस प्रतिमेचा अडसर

'आयटम क्वीन' म्हणून मिळालेल्या प्रसिद्धीचा तिला फायदा झाला, तसाच तो तिच्या करिअरसाठी एक मर्यादाही ठरला. तिला प्रामुख्याने केवळ ग्लॅमरस भूमिका आणि डान्स नंबरसाठीच विचारले जाऊ लागले. गंभीर आणि विविधांगी अभिनय करण्याची इच्छा असूनही, सिनेसृष्टीने तिला एका ठराविक साच्यातच पाहिले. तरीही तिने अनेक रिअॅलिटी शो आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आज यानाचा वाढदिवस असून तिने प्रसिद्धीच्या झगमगाटातही आपली एक वेगळी ओळख जपली आहे. आध्यात्माच्या शोधात आलेली ही परदेशी सुंदरी आजही भारतीय प्रेक्षकांच्या मनावर आपल्या नृत्याच्या जोरावर राज्य करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group