माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे... प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला , प्रकरण काय ?
माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे... प्रसिद्ध अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला , प्रकरण काय ?
img
वैष्णवी सांगळे
मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला काठीने मारहाण करण्यात आली आहे. ये रिश्ता क्या कहलाता है, स्वरागिनी, साथ निभाना साथिया यांसारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोचा भाग राहिलेले अभिनेते अनुज सचदेवा यांच्यावर रविवारी संध्याकाळी हल्ला झाला. 

अभिनेत्याने स्वतः या मारहाणीचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सांगितले आहे की, त्यांच्यावर सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हल्ला केला आहे. या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना, इतर कलाकार मंडळींना मोठा धक्का बसला आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीने अनुज सचदेवाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

अनुज सचदेवा यांनी रविवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात एक व्यक्ती त्यांना शिवीगाळ करत काठीने मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ऐकू येत असलेल्या ऑडिओनुसार, हा वाद कुत्र्यांमुळे झाला आहे. व्हिडिओमध्ये रक्ताने माखलेल्या अभिनेत्याने म्हटले आहे, या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीही तो व्यक्ती त्यांना सतत शिवीगाळ करत होता.

अनुज सचदेवाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "ही व्यक्ती मला किंवा माझ्या मालमत्तेचे काही नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी मी हा पुरावा पोस्ट करत आहे...सोसायटीच्या पार्किंगमध्ये चुकीच्या ठिकाणी लावलेल्या त्याच्या गाडीबद्दल सोसायटीच्या ग्रुपमध्ये कळवल्यामुळे त्याने माझ्यावर आणि माझ्या कुत्र्यावर काठीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोक्यातून रक्त वाहत आहे." त्या व्यक्तीने अनुज सचदेवाच्या कुत्र्याला देखील मारले. कुत्र्याचा आवाज व्हिडीओत ऐकू येत आहे.

अनुज सचदेवाने पोस्टमध्ये सोसायटीचा पत्ता तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या घराचा पत्ता सांगितला आहे. तसेच विनंती करत म्हणाला की, " कृपया ही माहिती अशा लोकांसोबत शेअर करा जे कारवाई करू शकतील..." अनुज सचदेवाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कलाकार, चाहते , नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहे. तसेच चाहते त्याच्यासाठी काळजी व्यक्त करत आहेत. हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला नेटकरी देत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group