मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे , यामुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे . काही महिन्यांआधी सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, दरम्यान असाच गोळीबार आता एका गायकाचा घरावर झाला आहे . लोकप्रिय इंडो-कॅनेडियन गायक आणि पंजाबी गायक एपी याच्या घरावर गोळीबार करण्यात आला आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कॅनडाच्या वैंकूवर या ठिकाणी त्याचं घर आहे आणि त्याच घरावर गोळीबार झाला आहे.
दरम्यान , त्याची एक पोस्ट सोशल मीडियानर व्हायरल झाली आहे. त्यात एपी ढिल्लोंच्या ल्लों घरावर फायरिंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याविषयी कोणतीही अधिकृत बातमी समोर आली नाही. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे स्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये देखील अशीच फायरिंग झाली होती.
एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, फायरिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याचा तपास सुरक्षा एजेंसिजें करत आहे. सुरक्षा एजेंसीला संशय आहे की या फायरिंगच्यामागे गोल्डी ब्रारच्या गॅंगचा हात आहे. एपी ढिल्लोंवरल्लों का केला हल्ला?
लॉरेंस बिश्नोई आणि रोहित गोदार गॅंगनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात सलमान खानचा उल्लेख करत त्याच्यासोबतची जवळीकता पाहता त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचं म्हटलं आहे.