दैनिक भ्रमर : अभिनेत्री, खासदार जया बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकावर त्या भडकताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जया बच्चन कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर जया बच्चन भडकतात. आणि त्याला त्या धक्का मारतातत. ही घटना काही पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वीही कधी घराबाहेर पापराझींवर ओरडताना तर कधी विमानतळावर भडकताना जया बच्चनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यावर जया बच्चन भडकतात. आणि त्याला त्या धक्का मारतातत.
जया बच्चनवर संतापल्या कंगना रनौत
जया बच्चन यांच्या वागणुकीवर कंगना रनौतने नाराजी व्यक्त केली आहे. कंगना रनौत यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर जया बच्चन यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की - 'सर्वात बिघडलेली आणि विशेषाधिकार प्राप्त महिला. लोक यांना फक्त यासाठी सहन करतात कारण त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत...किती अपमानजनक आणि लज्जास्पद बाब आहे.