कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं! पण ती बॉलिवूडचं मैदान सोडणार का? चर्चांना उधाण
कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं! पण ती बॉलिवूडचं मैदान सोडणार का? चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडीतून विजयी झाली आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे. कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री झाल्याने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाने घोषणा केली होती,"निवडणूक जिंकले तर बॉलिवूड सोडून देईन". 

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे आता 'पंगाक्वीन' मंडीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करत राजकारणातच स्वत:ला झोकून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 
 
विजयानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया?  

कंगना रनौतने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंहचा पराभव केला आहे. कंगना रनौतला 5,37,022 मते मिळाली आहे. 74,755 मतांनी तिने विक्रमादित्य सिंहचा पराभव केला आहे. विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने मंडीकरांचे आभार मानले आहेत. कंगनाने लिहिलं आहे,"मंडीतील माझ्या कुटुंबाचे खूप-खूप आभार.. मंडीकरांनी दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दलही आभार.. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे...हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. भाजपाने दाखवलेला हा विश्वास आहे. हा विजय सनातन विचारांचा आहे..हा विजय मंडीकरांच्या सन्मानाचा आहे". 

कंगना रनौतचा बॉलिवूडला रामराम? 
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज तकला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौत म्हणाली होती,"चित्रपटांत काम करायचा कधीकधी मला कंटाळा येतो. पण राजकारणामुळे लोक माझ्यासोबत जोडली जात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मी कदाचीत फक्त राजकरणच करू शकते. एकावेळी मी एकच काम करू शकते. दोन्ही करता येणार नाहीत. मंडीतून निवडूण आल्यानंतर मी राजकारणच करेल. अनेकांना मला राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला. पण मला लोकांसाठी काम करायला आवडतं. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर असेल". 
इतर बातम्या
Join Whatsapp Group