अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्यामध्ये अनेकांचा नाहक बळी गेला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये देखील असाच एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला.
हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा उपविभागातील चानवास भागात गुरूवारी रात्री हा भीषण अपघात झाला. भरधाव कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. रात्री उशिरा हा अपघात झाला.
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार थेट ५०० मीटर खोल दरीत पडली. मृतांमध्ये चाणवास येथील एका सरकारी शाळेतील शिक्षक राजेश कुमार, त्याच्या पत्नी आणि दोन मुलांचा अपघातात मृत्यू झाला. या अपघातामध्ये राजेश कुमार यांच्या मेहुण्याचा आणि कारचालकाचाही मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.