ढगाळ वातावरण अन मुसळधार पाऊस , 'या' राज्यांना हवामान विभागाकडून इशारा
ढगाळ वातावरण अन मुसळधार पाऊस , 'या' राज्यांना हवामान विभागाकडून इशारा
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. सध्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी वाढली असून पारा घसरताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे गारठा वाढला असल्याने राज्यातही थंडी वाढण्याचा अंदाज होता. मात्र, राज्यात येणाऱ्या शीतलहरी कमी असल्याने त्या तुलनेत थंडी कमी आहे. 

दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी बघायला मिळत आहे. राज्यात पुढील काही दिवसांमध्ये तापमानात सातत्याने चढउतार बघायला मिळेल. हरियाणाच्या नर्नुल येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. नर्नुल येथे 2.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यात आजही अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 3 ते 4 अंशांने तापमानात वाढ होऊ शकते. अनेक भागात सकाळच्यावेळी धुके आणि दव पडू शकतात.

दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 5 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला. यादरम्यान 40 ते 45 मैल प्रतितास वेगाने वारेही वाहण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, लडाख या राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला. पंजाबमधील बहुतेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group