पंजाबमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पटियालामध्ये राहणाऱ्या १० वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाचा केक खाल्ल्याने मृत्यू झाला असल्याचा दावा तिच्या कुटुंबियाने केला आहे. केक खाल्ल्याने तिची तब्येत बिघडली आणि काही तासांतच तिचे शरीर थंड पडले.
हा केक खाल्ल्याने तिच्या कुटुंबालाही त्रास झाला. तिच्या लहान बहिणीला देखील उलट्या झाल्या, परंतु उलट्यांमधून खाल्लेला केक बाहेर पडल्याने ती बचावली. तर वाढदिवस असलेल्या मुलीच्या तोंडातून दोनदा फेस आला. यामुळे कुटुंबाने तिला बरे वाटेल असा त्यांचा समज झाल्याने त्यांनी डॉक्टरकडे तिला नेले नाही.
मानवी रात्री झोपली, त्यानंतर पहाटे चार वाजता तिचे शरीर थंड पडल्याचे जाणवले, म्हणून पालकांनी धावपळ सुरु केली. तिला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्य़ात आले.
मानवीच्या आजोबांनी केलेल्या तक्रारीनुसार ऑनलाईन केक मागविण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजता मागविला, सव्वा सहाला केक घरी आला होता. त्यानंतर साडेसातला केक कापला गेला. पोलिसांनी केक कुठून आणला गेला याची चौकशी सुरु केली आहे. यानंतरच कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.