राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेय. अशातच आप पक्षाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. पंजाबमधील आमदार गरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झालाय. बायको-मुलं घरात असताना गोगी यांनी स्वत:वर गोळी झाडली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , बंदूक साफ कराताना गोगी यांना गोळी लागल्याचे समजतेय. पोलीस तपास करत आहेत. आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. गोगी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'आप'च्या आमदाराचा मृत्यू कसा झाला, अचानक गोळी कशी लागली? त्यांनी 'स्वतःवर' गोळी झाडली की दुसऱ्याने गोळी झाडली? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही.
पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. गोगी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार डीसीपी जसकरण सिंह तेजा यांनी आप आमदाराच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, 'त्यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. ही घटना रात्री 12 वाजता घडली.
' पोलिस आयुक्त कुलदीप चहल आणि उपायुक्त जितेंद्र जोरवाल हे डीएमसीएचमध्ये उपस्थित आहेत. आप आमदाराच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे. गोगी यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.