नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या आधीच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतंय.
लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून काही काँग्रेस उमेदवारांना अर्थसहाय्य करत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला. भाजपने काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित, फरहाद सूरी यांना कोट्यवधींचा निधी दिल्याचा दावाही आतिशींनी केलाय.
या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काँग्रेसने अजय माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करावी असा इशारा दिला आहे.
अजय माकन यांच्यावर कारवाई करा अन्यथा इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा केली जाईल आणि काँग्रेसची हकालपट्टी करण्याची मागणी केली जाईल, असा थेट इशारा आम आदमी पक्षानं दिला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अजय माकन यांच्यावर कारवाईची मागणी केली. काँग्रेसने तसे न केल्यास त्यांना इंडिया ब्लॉकमधून काढून टाकण्यासाठी आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.
काय म्हणाले होते अजय माकन?
अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणे आणि युती करणे ही चूक होती. त्यांची कोणतीही विचारधारा नाही, केजरीवाल देशद्रोही आहेत असं वक्तव्य काँग्रेस नेते अजय माकन यांनी केलं होतं. त्यावर आता आपकडून जोरदार टीका केली जात आहे.