शेवटच्या क्षणी खेळ पलटला, अपक्ष उमेदवाराचा अवघ्या १ मताने विजय
शेवटच्या क्षणी खेळ पलटला, अपक्ष उमेदवाराचा अवघ्या १ मताने विजय
img
वैष्णवी सांगळे
एक मताने निवडणुकीत काय फरक पडतो असा विचार करणारे विचारच करत राहतील आणि १ मताने सत्ता परिवर्तन देखील होऊन जाईल. छत्रपती  संभाजीनगरमधून धक्कादायक निकाल पुढे आला आहे. इथं अपक्ष उमेदवार सचिन गरड यांचा अवघ्या एका मताने विजय झाला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेना शिंदे गटाचा तगडा उमेदवार पाडला आहे. त्यामुळे एका मताची किंमत या दोन्ही उमेदवारांना चांगलीच समजली असेल हे नक्की. 

ईव्हीएम मतमोजणीत सचिन गरड हे १७ मतांनी आघाडीवर होते. पण पोस्टल बॅलेट मतात त्यांचं लीड कमी झालं. संभाजीनगर मध्य पश्चिम गटात वडगाव कोल्हाटीमध्ये एकूण १६ बॅलेट मतं पडली होती. ही सगळी मतं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळाली. तरीही ईव्हीएममध्ये १७ मतं अधिक असल्याने सचिन गरड एक मताने विजयी झाले. गरड हे भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहेत. त्यांचा विजय झाला असला तरी अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आली नाही. शिंदे गटाकडून फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्यामुळे इथं मतमोजणी होणार का?  याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group