हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ’१६ तारखेनंतर तुम्हाला कळेल…’
हल्ल्यानंतर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ’१६ तारखेनंतर तुम्हाला कळेल…’
img
वैष्णवी सांगळे
ऐन निवडणुकीच्या प्रचारात छत्रपती संभाजीनगर मधून मोठी बातमी समोर आली आहे. एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. प्रचार सुरु असताना हा हल्ला झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केला आहे. त्या वाहनात इम्तियाज जलील  पुढच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. 

इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या  डोळ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती आहे. प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडली आहे. एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. इतर जे कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात चौकशी सुरु आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

इम्तियाज जलील यांनी म्हटले की, ‘राजकारणात असे प्रकार होत असतात. मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. लोकशाहीने मला कुठही जाण्याचा आणि पदयात्रा करण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ते करत आहे. आता कुणाला आम्ही इकडे येऊ नये याबाबत आक्षेप असेल, मात्र आमचा उमेदवार आहे त्यामुळे आम्ही प्रचार करत आहोत. आता 16 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा तुम्हाला कळेल की काळ्या झेंड्यांचा अर्थ काय आहे आणि हिरव्या झेंड्याचा अर्थ काय आहे.’
इतर बातम्या
Join Whatsapp Group