“बाहेर आल्यावर अजून चार मुलींना मारेन” काय करणार ? कुख्यात गुंडाची पोलिसांनाच धमकी
“बाहेर आल्यावर अजून चार मुलींना मारेन” काय करणार ? कुख्यात गुंडाची पोलिसांनाच धमकी
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : सर्वसामान्यांना धमक्या देणं हे गुंडाचं रोजचंच काम. पण आता हे गुंड पोलिसांनाही मुली मारण्याचं ओपेन चॅलेंज देत आहे. ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरची. दहशत माजवणारा कुख्यात गुन्हेगार कंज़ल सय्यद एजाज ऊर्फ ‘तेजा’ आता पोलिसांनाही धमक्या देऊ लागला आहे. तेजाविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार, बलात्कार, अमली पदार्थ विक्री, शस्त्रसाठा बाळगणे अशा तब्बल 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याला गुन्हे शाखा आणि  सिडको पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री रंगेहाथ पकडले. 

सावध व्हा ! 'यादिवशी' राज्यात मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

अटकेनंतर पंचनाम्यासाठी नेताना तेजाने पोलिसांनाच धमकी देत “बाहेर आल्यावर अजून चार मुलींना मारेन” असे खुलेआम जाहीर करत आव्हान दिले.  सोमवारी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास तेजा एजाज याने किलेअर्क परिसरात वाद घालत स्वतःच्या मैत्रिणीवरच पिस्तुलातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली. गोळीबारात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर तेजा पळून गेला असला, तरी पोलिसांनी तातडीने शोध मोहीम राबवून त्याला बेगमपुरा परिसरातून अटक केली.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वात लष्कराची कारवाई; लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद

तेजा जेलमध्येच होता. अलीकडेच तो जामिनावर सुटला होता. बाहेर येताच त्याने पुन्हा हैदोस घालण्यास सुरुवात केली. जेलमधून सुटल्यानंतर समाजमाध्यमांवर ‘गोली मार के बता’ असे स्टेटस टाकून धमकी दिली. एवढेच नाही, तर थेट घरात घुसून गोळीबार करण्याचाही प्रयत्न त्याने केला. मंगळवारी तेजाला न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडीत 16 ऑगस्टपर्यंत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या अटकेनंतर शहरातील गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले असले, तरी तेजाच्या उघड धमक्यांमुळे पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. पोलिस तपासात या टोळीचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group