हिंदू समाजाला एकजूट करण्यासाठी बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 9 दिवसीय पदयात्रा काढली आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पंजाबमधील शिख कट्टरपंथीय नेता बरजिंदर परवाना यांनी बागेश्वर बाबांना ही धमकी दिलीय. यानंतर परवाना विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
बरजिंदर परवानाने स्टेजवरुन धमकी दिली. ‘बाबा नोट करं, तुझे दिवस भरले. तुलाही मारुन टाकणार’ असं परवाना म्हणाला. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या एका वक्तव्यावरुन त्याला ही धमकी देण्यात आलीय. बरजिंदर परवानाचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
“बागेश्वर धामचा एक साधू म्हणतो, प्रत्येक मंदिरात तो पूजा आणि अभिषेक करणार. मी सांगतो, ये पण एक गोष्ट लक्षात ठेवं, आम्ही इंदिरा गांधीला नाही सोडलं. बाबा नोट करं, तुझे दिवस भरले” असं बरजिंदर परवाना या व्हिडिओमध्ये बोलताना दिसतोय. “प्रत्येक मंदिर तर लांब, अमृतसरला येऊन दाखवं. तू ये तर खरं…तुला पण मारुन टाकणार” अशी धमकी दिली.