मोठी बातमी! छगन भुजबळांना धमकी , आरोपीला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी! छगन भुजबळांना धमकी , आरोपीला पोलिसांकडून अटक
img
Dipali Ghadwaje
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देत १ कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली. छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीने खंडणीची मागणी केली. भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड आणि संशयित आरोपीमध्ये संवाद झाला होता. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी आरोपीला सापळा रचत अटक केली.


छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेल अशी आरोपीने बतावणी केली होती.

आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. छगन भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळे खळबळ उडाली.

यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कुठून फोन आला आणि कुणी केला याचा तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत त्यांनी आरोपीचा शोध घेतला.   छगन भुजबळ यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी सापळा रचत अटक केली.

संशयित आरोपीने गुजरातच्या धरमपूर इथे पैसे घेऊन बोलावले होते. मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलावले. राहुल भुसारे या उच्चशिक्षित तरुणाने खंडणीची मागणी केली होती. संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group