दैनिक भ्रमर : राज्यात काही ठिकाणी पाऊस कमी झाला असेल तरी येत्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील दक्षिण कोकण-गोवातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात सोळा ऑगस्टला काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मुंबई येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे या काळात नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये, उत्तर कोकण जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज १३ ऑगस्ट रोजी कोकणामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकटात होऊ शकतो.