राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस ;
राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस ; "या" 9 जिल्ह्यांना अलर्ट जारी
img
Dipali Ghadwaje
राज्यात उकाड्याने सर्व नागरिक हैराण आहे.मात्र राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी लागत आहे. आता राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येत्या 3 ते 4 तासात जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजी नगर, रायगड  या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट सह तुफान पावसाची शक्यता भारतीय हवामान विभाग कडून वर्तवण्यात आली आहे.

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे तो आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. तो 30 मे रोजी केरळात दाखल होणार आहे. येत्या 24 तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पाऊसकाळात ताशी 30-40 किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पाऊस पडत होता, तर कुठे तापमानाचा पारा 40 च्या वर गेला होता. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.  तापमानाचा पारा चाळीसीपार गेल्याने कमालीचा उकाडा जाणवत आहे.

दरम्यान, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश अशंतः ढगाळ आणि दुपार /संध्याकाळ पर्यंत मुख्यतः निरभ्र राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

मुंबईतील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 29अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. दुसरीकडे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group