त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी गुडघ्या एवढे पाणी
त्र्यंबकेश्वरला मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी गुडघ्या एवढे पाणी
img
दैनिक भ्रमर
ञ्यंबकेश्वर (सतीश दशपुत्रे) : येथे आज रात्री आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

अवघ्या अर्ध्या तासात पावसाने ञ्यंबकेश्वर येथील तेलीगल्ली, मेनरोड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यावसायिकांची धावपळ उडाली. ञ्यंबकेश्वर शहरातील रस्त्यावरून पाणी वाहत होते. सखल भागात कमरे इतके तर काही ठिकाणी गुडघ्याला लागेल इतके पाणी वाहत होते.

रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचेही नुकसान झाले आहे. या पावसाने भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. बाहेर गावच्या भाविकांना येथील रस्त्यांची कल्पना नाही. रस्त्यावरून वाहणारे पाण्याचे लोट आणि त्यामधून मार्ग काढणारे भाविक असे दृष्य पहावयास मिळत होते.
     
यावर्षी मुसळधार पाऊस होताच पुर येत असल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. वारंवार निर्माण होणारी पुर परिस्थिती आणि त्यानंतर रस्त्यावर येणारा गाळ यामुळे ञ्यंबकेश्वर येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group