मुंबईची होरपळ,
मुंबईची होरपळ, "या" भागात पावसाचा तडाखा; IMD चा अंदाज काय सांगतो? वाचा
img
Dipali Ghadwaje
मान्सूनच्या राज्यातील आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले असले तरीही मान्सूनपूर्व पाऊस, मधूनच दाटून येणारे ढग असं एकंदर वातावरण मात्र चकवा देऊन जात आहे. सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उष्णतेचा दाह वाढताना दिसत आहे. विदर्भात जिथं एकीकडे अवकाळीचा इशारा देण्यात आला आहे, त्याच विदर्भात दुसरीकडे तापमान चाळीशीपलिकडे जात असल्याचं पाहायला मिळालं आहे. तसेच मुंबईतही चित्र वेगळं नाही. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईच्या हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यामुळं इथं उकाडा अपेक्षेहून जास्त असल्याचं भासत आहे. शहरात तापमानाचा आकडा जास्त नसला तरीही त्या तापमानाचा दाह मात्र अधिक असल्यामुळं घामाच्या धारा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच शहराच्या काही भागांमध्ये असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळं अधिकच कोंडी होताना दिसत आहे. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये शहरातील वातावणारत फारसे बदल अपेक्षित नाहीत. मात्र दिवस मावळतीला जात असताना ढगांची दाटी मात्र पावसाची चिन्हं दाखवून जाऊ शकते. असं असलं तरीही मुंबई आणि उपनगरावर, थोडक्यात महाराष्ट्रावर अद्याप मान्सूनची कृपा नाही ही वस्तूस्थिती. शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात हवामान कोरडं असेल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मात्र हलका ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दक्षिण कोंकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी , उत्तर कोंकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, आणि सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group