मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही असून त्यामुळे कमी दाबाचापट्टा निर्माण झालाय. यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. १ नोव्हेंबर उजाडला असूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिलाय. 
मुंबईमध्ये रात्रभर पाऊस कोसळला असून सकाळीही पावसाचा जोर बघायला मिळतोय. विदर्भ, मराठवाड्यात आजही पावसाचा इशारा आहे. राज्यातील अनेक भागात विजांसह पावसाचा अलर्ट आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी राजा चिंतेत असून पिकांचेही मोठे नुकसान झाले. 
नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, मुंबई, नाशिक आणि धुळेसह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट आणि ‘हाय अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये पुढील २४ तासांसाठी हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 
पुढील एक ते दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस सुरू राहील  नंदुरबार, जळगाव, धुळे, आहिल्यानगर रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे पालघर या भागात पाऊस होईल. फक्त राज्यच नाही तर देशातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलाय.