सावधान...! राज्यात आज पुन्हा जोरदार पाऊस , 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
सावधान...! राज्यात आज पुन्हा जोरदार पाऊस , 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
img
Dipali Ghadwaje
राज्यामध्ये गेल्या एक ते दोन दिवसांपासून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे येथे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच  आज (सोमवार) राज्यात विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना उन्हाचा कडाका देखील जाणवत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

काल सायंकाळी नवी मुंबई यासोबतच नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील पूर्व  भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने सोयाबीन, भात पिकासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
"या" ठिकाणी आज पाऊस?

आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group