राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळपासून चांगलाच वाढला. मुंबई, ठाणे, पनवेलसह पुणे, सातारा रायगड, बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाकडून मुंबईमध्ये पुढील चार ते पाच तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन तास मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. तर रेल्वेही उशिराने धावत आहेत.
जोरदार पावसाचा इशारा - रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.
जोरदार वादळी पावसाचा इशारा - मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा.
विजांसह वादळी पावसाचा इशारा - नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया