नाशिक : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ
नाशिक : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नाशिक शहरात जोरदार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आज सकाळी १० वाजता गंगापूर धरणातून २६५७ क्यूसेस पाणीने सोडण्यात आले आहे. तर १ वाजता ४३९७ क्युसेक्स पाणी गंगापूर धरणातून सोडण्यात आले आहे. ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

हे ही वाचा... 

गंगापूर धरण व गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्याने गंगापूर धरणातून विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहे. तरी बुधवारचा आठवडे बाजार नदी पात्रामध्ये किंवा नदीपात्रालगत भरण्यात येऊ नये असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे , त्यामुळे आजचा आठवडे बाजार बंद राहणार आहे. याची सर्वांनी  नोंद घ्यावी. 

तर आज 20 ऑगस्ट रोजी दारणा धरणातून सुरू असलेला 5778 क्युसेक्स विसर्ग हा सकाळी 11 वाजता 4506 क्युसेस ने वाढ करून एकूण 10284 क्युसेसने सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण बघता यात वाढ होण्याची शक्यता आहे. नदीलगतच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group