राज्यात पुढील काही दिवसांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यात आज काही जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुंबईसह ठाणे, पालघर येथे मुसळधार पाऊस तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागांमध्ये देखील अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तास मुंबई आणि कोकणातील जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत.
रेड अलर्ट - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा
ऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाटमाथा
यलो अलर्ट - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
त्यामुळे अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडा. बाहेर जाताना रेनकोट , छत्री अवश्य घेऊन जा.