राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने, तसेच अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहे.
आज (ता. १५) मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता असल्याने, तसेच अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
संपूर्ण कोकण, विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा. (ऑरेंज अलर्ट) :
नाशिक, सातारा.
वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
अहिल्यानगर, पुणे.
वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :
पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.