मोठी बातमी : शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची आत्महत्या ; नेमकं काय प्रकरण?
मोठी बातमी : शनी शिंगणापूर संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची आत्महत्या ; नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje

महिनाभरापूर्वी 114 मुस्लीम कर्मचारी घेतल्यानंतर शनि शिंगणापूर विश्वस्त मंडळाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते , दरम्यान शनि शिंगणापूर देवस्थानात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जात होती. अशातच आता अहिल्यानगरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शनि शिंगणापूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीश शेटे यांनी सोमवारी सकाळी टोकाचं पाऊल उचललं. अशातच आता संपूर्ण शनि शिंगणापूरमध्ये खळबळ उडाल्याचं लहायला मिळतंय.

नितीन शेटे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. मात्र, सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांनी राहत्या घरी छताला दोर टांगला आणि गळफास घेत आत्महत्या केली. नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह खाली उतरवून पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शनी शिंगणापूरमध्ये शोककळा पसरल्याचं पहायला मिळतंय.
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group