भीषण अपघात : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस संरक्षण भिंतीला धडकली ; नेमकं काय घडलं?
भीषण अपघात : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बस संरक्षण भिंतीला धडकली ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
राज्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशातच बोईसर बस आगारात बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झालाय.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बस आगाराच्या संरक्षण भिंतीला धडकली. या अपघातात चालक आदिनाथ कुटे गंभीर जखमी झालेत. जखमी बस चालकावर बोईसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

बसचा अपघात घडल्यानंतर आगारात बघ्याची मोठी गर्दी जमली होती. बस चालकाला गंभीर दुखापत झाली असून रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचं दिसून आले.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महामंडळाच्या बसेसच्या अपघाताच्या घटना वारंवार होताना दिसत आहे. नादुरुस्त बस रस्त्यावर धावत असल्यानं अपघात होत असल्याचं निदर्शनात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group