मद्यपींचे होणार वांदे..! आज राज्यात सक्तीचा 'ड्राय डे', करवाढीविरोधात हॉटेल आणि बार चालकांचा संप
मद्यपींचे होणार वांदे..! आज राज्यात सक्तीचा 'ड्राय डे', करवाढीविरोधात हॉटेल आणि बार चालकांचा संप
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्य सरकारने वाढवलेल्या कराविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांनी सरकारच्या कर धोरणांविरोधात एकजुटीने आवाज उठवला आहे.

इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी आज, 14 जुलै 2025 (सोमवार) रोजी राज्यभर बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

तर, असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स या संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी सरकारच्या कर वाढीविरोधात संताप व्यक्त केला.

एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, दारूवरील मूल्यवर्धित कर  5% वरून थेट 10% पर्यंत वाढवण्यात आला. यानंतर, आर्थिक वर्ष 2025-26 साठी परवाना शुल्कात 15% वाढ झाली. आता, उत्पादन शुल्कात 60% वाढ झाल्याने बार चालवणे कठीण झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सुमारे 20,000 बार मालकांनी संपावर जाण्याची भूमिका घेतली होती, यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरातील 8,000 बारचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र आधीच विविध अडचणींमध्ये आहे. अशा वेळी हे करवाढीचे निर्णय म्हणजे सरळसरळ अन्याय आहे. हे आंदोलन आमचा 'सामूहिक आक्रोश' असून, सरकारने ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायसुलभतेचा विचार करावा अशी आमची ठाम मागणी बार चालकांनी केली आहे

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group