ईडीची मोठी कारवाई : बेकायदेशीर डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ३.३ कोटींची रोकड जप्त
ईडीची मोठी कारवाई : बेकायदेशीर डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ३.३ कोटींची रोकड जप्त
img
Dipali Ghadwaje

मुंबई : प्रवर्तन संचालनालयाने मुंबईमध्ये बेकायदेशीर डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणावर मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , चार ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे ३.३ कोटी रुपये रोकड, लक्झरी घड्याळं, दागिने, परदेशी चलन आणि लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत करण्यात आली आहे.

ईडीच्या तपासात VMoney, VM Trading, Standard Trades Ltd., iBull Capital, LotusBook, 11Stars, GameBetLeague यांसारख्या डब्बा ट्रेडिंग व सट्टेबाजीशी संबंधित अ‍ॅप्स आणि कंपन्यांची चौकशी सुरू आहे. व्हाईट लेबल अ‍ॅप्सच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टेबाजी चालवली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

या नेटवर्कच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर हवाला व्यवहार होत असल्याचेही ईडीला आढळले असून, फंड हँडलर्स आणि हवाला ऑपरेटर्स यांचीही ओळख पटवण्यात आली आहे.

सध्या संपूर्ण पथक डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. ही कारवाई देशभरातील बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर धडक देण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा एक भाग आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group